प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
दीक्षांत समारोहाला डोक्यावर ख्रिस्त्यांप्रमाणे असणारी टोपी भारतात नको !
‘रामनगर (बेळगाव) येथील सनातनची साधिका कु. नकुशा रामा नाईक ही ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम आली आहे. ७ फेब्रुवारीला तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी तिने डोक्यावर दीक्षांत समारोहासाठी पाश्चात्त्यांच्या संस्कृतीप्रमाणे टोपी घातली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचीही उपस्थिती होती.’
चेतावणी का देता ? सरकार कृती का करत नाही ?
‘भारतातील शेतकरी आंदोलनाच्या वेळी ‘विविध ट्विटर खात्यांवरून देशविरोधी ट्वीट्स करणार्या खात्यांवर कारवाई करण्याची मागणी भारत सरकारने ट्विटरकडे केली होती. या संदर्भात ट्विटरचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्र सरकारच्या माहिती अन् तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव यांची बैठक झाली. यात ‘आस्थापनाचे स्वत:चे नियम असतील; परंतु ट्विटरला भारतात भारतीय कायद्यांचे पालन करावेच लागेल. सरकारने सांगितलेल्या सर्व खात्यांवर कारवाईही करावी लागेल’, अशी चेतावणी सरकारने दिली.’