जालंधर (पंजाब) येथे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मंदिराचे पुजारी घायाळ

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांचे पुजारी असुरक्षित !

मंदिराचे पुजारी संत ज्ञान आणि अल्पवयीन मुलगी

जालंधर (पंजाब) – येथील फल्लौर गावातील मंदिराचे पुजारी संत ज्ञान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्याची घटना घडली. यात पुजारी संत ज्ञान यांना ३ गोळ्या लागल्या, तर एक अल्पवयीन मुलगीही यात घायाळ झाली.

या दोघांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी पुजारी संत ज्ञान यांनीच येथे मंदिर बांधले होते. तेव्हपासून काही जणांकडून मंदिराला विरोध केला जात आहे.