ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या हातात द्या ! : देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची पंतप्रधान मोदी यांना सूचना
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आणि तमिळनाडू राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.