देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये अहिंदू अन् अश्रद्ध यांना प्रवेशबंदी करा ! – हिंदु जनजागृती समितीचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन

अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांविषयी घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता ! अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत !

सासाराम (बिहार) येथे कोरोनामुळे कोचिंग सेटर बंद केल्याने विद्यार्थ्यांकडून तोडफोड आणि जाळपोळ

नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?

बांगलादेशात जिहादी संघटनेच्या पदाधिकार्‍याला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.

सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ

मुकेश अंबानी यांच्या निवास स्थानाच्या बाहेर स्फोटकांसाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पोलीस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्मभूमीतच अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

(म्हणे) ‘सध्याचे शासनकर्ते भारताला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत !’ –  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा आरोप

सध्याच्या शासनकर्त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवले, तर त्यात चूक ते काय ? हिंदूंच्या राज्यात शिखांना कसली भीती ?

श्रीलंकेच्या नौकेमधून ३०० किलो हेरॉईन, ५ एके-४७ रायफली जप्त

हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते.

सांगली महापालिकेच्या उद्यान पर्यवेक्षकास ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक

अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.