|
ढाका (बांगलादेश) – काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेले असता, तसेच तेथून परतल्यावर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या मागे जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा हात होता. या प्रकरणी पोलिसांनी एका रिसॉर्टमध्ये धाड टाकून या संघटनेचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली. तो येथे एका महिलेसमवेत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आला.
(सौजन्य : Riaan tv)
शेख हसीना यांनी या घटनेवर संसदेत म्हटले आहे की, मामूनुल हक यांनी इस्लामचा अवमान केला आहे. मला मामूनुल हक यांच्या चारित्र्याविषयी काही बोलायचे नाही. तुम्ही सर्वांनीच त्यांना अपवित्र काम करतांना पाहिले आहे. ते नेहमी कर्म आणि धर्म यांच्याविषयी बोलत असतात. देशभरात हिंसाचार पसरवून मामूनुल मौज-मजा करण्यासाठी एका सुंदर महिलेसमवेत एका रिसॉर्टवर गेले. ते इस्लामच्या नावे कलंक आहेत. हे लोक इस्लामला अपकीर्त करत आहेत. इस्लाम मानणारी कोणीही व्यक्ती खोटे बोलू शकते का ? असे लोक धर्माचे कसे पालन करतील आणि लोकांना तरी काय सांगतील ? अशा काही लोकांमुळे इस्लामचे नाव आतंकवाद आणि चारित्र्यहिन लोक यांच्याशी जोडले गेले आहे