स्कॉर्पिओ स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
मुंबई – राष्ट्रीय गुन्हे शाखेकडून सचिन वाझे प्रकरणात मीना जॉर्ज यांना मीरा रोड येथील त्यांच्या भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्या काळा पैसा पांढरा करत असल्याचे म्हटले आहे. वाझे यांना भेटण्यासाठी हॉटेल ट्रायडेंटमध्ये मीना जॉर्ज या पैसे मोजण्याच्या यंत्रासमवेत आल्या होत्या. गेले १५ दिवस त्यांचा शोध चालू होता. सीसीटीव्हीमध्ये त्यांचा तोंडावळा आला होता. वाझे यांचा काळा पैसा पांढरा करून देत असल्याचा संशय आहे. जॉर्ज यांच्या घरातही अनेक कागदपत्रे सापडली आहेत.
स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणी ज्या धमक्या देण्यात आल्या होत्या, त्या मुंबईतील गुन्हेगारी विश्वाकडून देण्यात आल्याचे एन्.आय.ए.ने म्हटले आहे.