चेन्नई (तमिळनाडू) – येथील अमली पदार्थ नियंत्रण पथकाने तटरक्षकदलाच्या साहाय्याने श्रीलंकेच्या एका नौकेमधून ३०० किलो हेरॉईन, ५ एके-४७ रायफली आणि त्यांची १०० काडतुसे जप्त केली. तसेच श्रीलंकेच्या ६ नागरिकांना अटक करण्यात आली.
Sri Lankan boat associated with Pak drug network intercepted off Kerala coast with 300 kg heroin, arms https://t.co/u408sxOuHT #Kerala
— Oneindia News (@Oneindia) March 31, 2021
हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते. भारतीय सागरी सीमेतून जात असतांना नौकेवर कारवाई करण्यात आली.