विदर्भासाठी ऑक्सिजनचा पुरेसा साठा, आवश्यकता भासल्यास मुंबईतून पुरवठा करणार ! – अन्न आणि औषध प्रशासन 

कोरोना रुग्णांतील गंभीर रुग्णांचा आकडा अल्प झाल्याने राज्यातील ऑक्सिजनची वाढलेली मागणी मागील ३ मासांत पुष्कळच अल्प झाली होती; मात्र या आठवड्यात विदर्भातील ऑक्सिजनच्या मागणीत काहीशी वाढ झाली असून पुढील १५ दिवसांत मागणी वाढण्याची भीती आहे.

जालना येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंगारकीच्या दिवशी श्री राजुरेश्‍वर गणेश मंदिर बंद !

येत्या २ मार्च या दिवशी अंगारकी चतुर्थी आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रतिबंधात्मक आदेशांनुसार अंगारकी चतुर्थीनिमित्त १ मार्च या दिवशी सायंकाळी ते २ मार्च या रात्री उशिरापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

माघ द्वादशीलाही श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद रहाणार !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २४ फेब्रुवारी (माघ शुक्ल पक्ष द्वादशी) या दिवशी श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

जालना येथे दळणवळण बंदी नाही; पण कठोर निर्बंध लागू !

यामध्ये ३१ मार्चपर्यंत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शाळा वगळता इतर शाळा, वसतीगृहे, शिकवणीवर्ग, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलने हे सर्व बंद रहाणार आहे. शाळा, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये जरी बंद असली, तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.

अकोला येथे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासह पेट्रोल पंपांवर गर्दी

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद असली, तरीही काही जणांनी ही दुकाने चालू केली आहेत. त्यामुळे अशा दुकानांवर महापालिका प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचारी एकत्र फिरून संबंधितांवर कारवाई करत आहेत.

पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार बहुमताअभावी कोसळले

काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?

गलवानमध्ये ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या संख्येविषयी प्रश्‍न विचारणार्‍या तिघा चिनी पत्रकारांना अटक !

मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?

उत्तरप्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात अयोध्येसाठी ४०४, तर काशीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.

केरळ सरकार ‘लव्ह जिहाद’कडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे ! – योगी आदित्यनाथ

हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

मेट्रो मॅन !

भाजपने श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातही प्रत्येक आश्‍वासन सत्ता आल्यास किती दिवसांत पूर्ण केले जाईल, हेही दिनांकानुसार घोषित केले जावे, असे वाटते. मुख्यमंत्री झाल्यास श्रीधरन् त्या दृष्टीने प्रयत्न करतील, याची शंका वाटत नाही.