चिनी आस्थापनांना गुंतवणूक करण्याची अनुमती देण्याचा कोणताही विचार नाही ! – केंद्र सरकार
राष्ट्रहितासाठी चिनी आस्थापनांना आता भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती देऊ नये !
राष्ट्रहितासाठी चिनी आस्थापनांना आता भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती देऊ नये !
देहली सरकारने पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या ५ राज्यांतून येणार्या नागरिकांकडून कोरोनाचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल असल्यावरच देहलीत प्रवेश करू देण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी गावात ७ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे गावकर्यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमांतून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमांना गावकर्यांसहित बाहेरगावाहून काही मंडळी सहभागी झाली होती; मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्याने गावात संसर्ग पसरला.
गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.
श्रीरामाने निर्माण केल्याचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेला वाळुकेश्वर येथील बाणगंगा कुंड विकासक इमारतीसाठी करत असलेल्या खोदकामामुळे बाधित झाले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला काळाबाजार हे रेल्वे यंत्रणेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. या प्रकरणी कारवाई करतांना काळाबाजार रोखण्यासाठीही केंद्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी ठोस भूमिका घ्यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते.
आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्यांना अभय देणे आवश्यक !
‘ब्रिक्स’मध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग आहे.
शासकीय परिपत्रक काढून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणार्या मंत्रालयातच कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा वाजले आहेत. याविषयी महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णु पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना मंत्रालयातील दु:स्थितीविषयी अवगत केले आहे.