मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागातील २ लाचखोर निरीक्षकांसह एक इसम कह्यात

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !
 
मुंबई, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – मालाड येथील पी उत्तर विभागात तक्रारदाराचे दुकान आहे. या दुकानाच्या फलकावर कारवाई न करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागातील निरीक्षक नितीन पाटणकर आणि हरिश्‍चंद्र घेगडमल यांनी २ लाख २५ सहस्र रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ६० सहस्र रुपये देण्याचे ठरले. लाचेची ही रक्कम सुदेश पॉल या व्यक्तीच्या माध्यमातून घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या अन्वेषणातून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिघांनाही कह्यात घेतले आहे.