कोटकामते ग्रामसेवकाला लाच स्वीकारतांना अटक

  • भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळेच तो खोलवर किती पसरला आहे, हे लक्षात येते !
  • भ्रष्टाचार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यासह त्यांची सर्व संपत्ती जप्त केली, तर भ्रष्टाचार्‍यांना जरब बसेल !

देवगड – तालुक्यातील कोटकामते ग्रामपंचायतीच्या बाहेर २ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना ग्रामसेवक दीपक केतकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० मार्चला रंगेहात पकडले.

ग्रामसेवक केतकर हे प्रत्येक कामासाठी पैसे मागत असतात, तसेच घरकुल योजनेच्या कामासाठी पैशांची मागणी करत आहेत, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार कोटकामते ग्रामपंचायतीच्या बाहेर ३० मार्चला सापळा रचून केतकर यांना अटक करण्यात आली.