इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – ठेकेदार उमेश माळी यांच्याकडून लाच स्वीकारतांना येथील वीज महावितरण आस्थापनाच्या कार्यालयात साहाय्यक अभियंता सुनील चव्हाण यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. सुनील चव्हाण यांनी घरगुती वीजजोडणीचा प्रस्ताव संमत करण्यासाठी सरकारी वीजजोडणी ठेकेदाराकडे ७ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. माळी यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती.