महर्षीही ज्यांची थोरवी वर्णितात, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

२१.७.२०२४ या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या ९० व्या व्यष्टी संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी स्फुरलेले भक्तीगीत आणि इतर सूत्रे येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या चैतन्यमयी सत्संगात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

एका सत्संगात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना प्रार्थना करायला सांगितली. त्यानंतर त्यांनी साधकांना डोळे बंद करून वातावरणातील पालट अनुभवायला सांगितले. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

हुपरी येथील अनधिकृत मदरशावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन !

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ जानेवारी १९८४ या दिवशी हुपरी येथील या ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ यांचा जागा मागणी अर्ज फेटाळला आहे.

धर्मादाय रुग्णालयांतील खाटांची घरबसल्या माहिती

उपमुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य कक्षाच्या ऑनलाईन प्रणालीचे २ ऑक्टोबर या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील सस्मिता इमारतीमध्ये उद्घाटन झाले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार !; सेवानिवृत्त पोलिसाला वेतन चालूच !

जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार ! जळगाव – गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २८ रुपये असून राज्यशासनाने नुकतेच प्रतिलिटर ७ रुपये अनुदान घोषित केले आहे; मात्र ‘जिल्हा दूध संघा’ने ३० रुपये प्रतिलिटर खरेदीदर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. संघाकडे दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी ३७ रुपये प्रतिलिटर … Read more

सोलापूर येथील शाळा आणि महाविद्यालये येथे मुसलमानांकडून इस्लामच्या प्रचारासाठी राबवली जात आहे धडक मोहीम !

‘गीता शाळेत शिकवणार’, असे म्हटल्यावर शिक्षणाचे भगवेकरण झाल्याची आरोळी ठोकणारे निधर्मी आणि साम्यवादी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? एकाही प्रसारमाध्यमातून या शिक्षणाच्या हिरवेकरणाचे वृत्त दिले जात नाही, हे लक्षात घ्या !

Hezbollah Attacks on Israel : हिजबुल्लाकडूनही इस्रायलवर आक्रमण

इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर लेबनॉनमध्ये घुसलेल्या इस्रायलच्या सैन्यावर हिजबुल्लाने आक्रमण केले. दक्षिण लेबनॉनमधील ओदेसा येथे झालेल्या या आक्रमणात इस्रायलचे ४ सैनिक ठार झाले, असा दावा हिजबुल्लाने केला आहे.

संत गहिनीनाथांच्या समाधीवर अतिक्रमण करण्याचा जिहाद्यांचा प्रयत्न सतर्क हिंदूंनी उधळला !

धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनी सर्वत्र अशी सतर्कता  दाखवली, तर हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी कुणी अतिक्रमण करू धजावणार नाही !

प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाने मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा  

मुंबई – भारतातील तरुणींमध्ये श्री दुर्गादेवीप्रमाणे शक्ती आणि सामर्थ्य यावे, त्यांच्यात अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होऊन आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाने ‘हर घर दुर्गा’ हे अभियान राबवावे. याद्वारे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे ‘हर घर … Read more

‘जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्‍या शासकीय समितीतून शाम मानव, मुक्‍ता दाभोलकर आणि अविनाश पाटील यांची हकालपट्टी करा !

वास्‍तविक अशी मागणी करण्‍याची वेळ वारकर्‍यांवर येऊ नये. सरकारने स्‍वतःहून ही कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !