बेरूत (लेबनॉन) – इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर लेबनॉनमध्ये घुसलेल्या इस्रायलच्या सैन्यावर हिजबुल्लाने आक्रमण केले. दक्षिण लेबनॉनमधील ओदेसा येथे झालेल्या या आक्रमणात इस्रायलचे ४ सैनिक ठार झाले, असा दावा हिजबुल्लाने केला आहे. इस्रायलच्या सैन्याने दावा केला आहे की, हिजबुल्लाने २ ऑक्टोबरला अनुमाने १०० रॉकेट डागले आहेत. त्यांपैकी १० रॉकेट वेस्टर्न गॅलीली आणि हैफा खाडी क्षेत्राकडेही डागले आहेत. यात कुणालाही दुखापत झाली नाही.