गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

गणपतीच्या नावाचा उल्लेख वाक्यात योग्यप्रकारे न केल्यास त्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो. त्यामुळे देवतांच्या नावांचा उल्लेख करतांना योग्य ती काळजी घ्यावी.

पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीशी चाळे करणार्‍याला अटक !

आईच्या प्रियकराने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत  रक्षाबंधनाच्या दिवशी अश्लील चाळे केले. यापूर्वीही असे घडले असतांना तिने आईला सांगितले होते; परंतु आईने त्याकडे दुर्लक्ष केले.

‘आयटीआय’मधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण देणार !

‘हर घर दुर्गा’ या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. शारीरिक प्रशिक्षणाच्या तासिकेप्रमाणे विद्यार्थिनींसाठी आत्मरक्षण प्रशिक्षणाची राखीव तासिका चालू करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध आस्थापन ‘पितांबरी’च्या सौजन्याने पाचल परिसरातील ६४ देवळांमध्ये धर्मशिक्षण देणारे १७० फ्लेक्स फलक प्रदर्शित !

देश-विदेशांमध्ये दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध असणार्‍या ‘पितांबरी’ आस्थापनाच्या सौजन्याने पाचल परिसरातील ६४ देवळांमध्ये धर्मशिक्षण देणारे १७० फ्लेक्स फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे महाविकास आघाडीकडून सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन !

राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

मीरारोड येथील गोमांस तस्कर कुरेशी याच्यावर हद्दपारीची कारवाई !

मीरारोड येथील गोमांस तस्कर आणि जनावरे यांचा अवैध विक्रेता कासमअली शरीफ कुरेशी (वय ५३ वर्षे) याला मीरा-भाईंदर पोलिसांनी हद्दपार केले आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे राजकारण्यांनी  स्वार्थासाठी भांडवल करू नये ! – शिवभक्त स्वप्नील घोलप

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने वाशी येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी राज्य पातळीवर ३ सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण

गणेशोत्सवातील अधिक बसगाड्यांची मागणी लक्षात घेता नवीन गाड्या खरेदी करून त्यांचा वापर होण्याची प्रक्रिया आधीच का झाली नाही ?

नवी मुंबईत रोजगाराच्या विपुल संधी ! – संदीप नाईक, जिल्हा अध्यक्ष, भाजप

‘संदीप नाईक प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित १० व्या विनामूल्य महारोजगार मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याचा ४५० उमेदवारांनी लाभ घेतला असून १८० उमेदवारांची तात्काळ निवड करण्यात आली आहे.

शालेय मुलीवर वाहनचालकाकडून अत्याचाराचा प्रयत्न !

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनचालक नागनाथ गायकवाड याने शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक करून ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.