‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले पू. (श्रीमती) निर्मला दाते (सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत, वय ९२ वर्षे) यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांना पुष्कळ शारीरिक थकवा होता. त्या खोलीत आम्ही ४ साधक उभे होतो. परात्पर गुरु डॉक्टरांना थकवा असल्याने क्षीण झालेल्या आवाजात ते एका साधकाला म्हणाले, ‘‘तुझ्या पाठीमागे पलंगावर उशी आहे. ती मागे सरकवून ठेव.’’ त्या साधकाने तसे केले. नंतर परात्पर गुरु डॉक्टर त्या साधकाला म्हणाले, ‘‘त्या पलंगावर मध्यभागी असलेले साहित्यही मागे ठेव.’’ त्या साधकाने ही कृती केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘आता सर्व जण पलंगावर बसा !’’ यातून ‘परात्पर गुरु डॉक्टर स्वतःला पुष्कळ शारीरिक थकवा असूनही साधकांचा विचार करत असतात’, हे माझ्या लक्षात आले आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२४)