भाद्रपद शुक्ल एकादशी (१४.९.२०२४) या दिवशी श्री. नंदकुमार कैमल यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. नंदकुमार कैमल यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !
१. परिस्थिती स्वीकारणे
१ अ. साधिकेला लहान बहिणीप्रमाणे समजून घेऊन क्षमा करणे : ‘नंदकुमार कैमल यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे; परंतु मागील एक वर्षामध्ये त्यांनी ‘परिस्थिती स्वीकारणे’ या स्वभावदोषावर पुष्कळ प्रयत्न केले. मला त्यांच्याकडून सेवेमध्ये काही अपेक्षा असायच्या आणि त्यामुळे कधी कधी माझी चिडचिडही व्हायची. त्या वेळी त्यांनी मला लहान बहिणीप्रमाणे समजून घेतले. काही प्रसंग झाला, तर ते मला समजून घेऊन क्षमा करायचे. अन्य साधकासमवेतही एखादा कटू प्रसंग घडला, तर दादा दुसर्या दिवशी मनात कोणताही कटूपणा न ठेवता पुन्हा पूर्वीसारख्या सहजतेने वागतात.
१ आ. पू. सौदामिनी कैमल (आई) यांनी देहत्याग केल्यावर स्थिर रहाणे : त्यांच्या आई, पू. सौदामिनी कैमल यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांनी देह ठेवला. तेव्हा नंदकुमारदादा अगदी स्थिर होते. त्यांना बहीण-भाऊ असे कुणीच नाही, तरीही त्यांनी सर्व परिस्थिती सहजतेने स्वीकारली.
२. चिकाटीने प्रयत्न करणे
दादांमध्ये ‘चिकाटी’ हा गुण आहे. कोणत्याही प्रयत्नांना आरंभ केल्यावर ते चिकाटीने प्रयत्न करतात. रात्री कितीही उशीर झाला, तरी सर्व प्रयत्न पूर्ण करण्याकडे त्यांचे लक्ष असते.
३. प्रेमभावाने अनेकांना संस्थेच्या कार्याशी जोडून ठेवणे
दादांच्या मनात सर्व साधक, तसेच हितचिंतक या सर्वांप्रती प्रेम आहे. भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांनी अनेकांना संस्थेच्या कार्याशी जोडून ठेवले आहे.
४. त्यागी आणि निरीच्छ वृत्ती
दादा स्वतःकडील वस्तू इतरांना सहजतेने देतात. ‘त्या वस्तू परत मिळायला हव्यात’, अशी त्यांची अपेक्षा नसते.
‘दादांमधील हे गुण माझ्यातही येऊ देत आणि दादांची जलद आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, ही गुरुचरणी प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर, कोची, केरळ. (२५.७.२०२४)