१. अधिवक्ता दिलीप देशमुख (सेवानिवृत्त, मुख्य जिल्हा न्यायाधीश), पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘मला आश्रम पाहून समाधान वाटले.
आ. खरोखरच हिंदु धर्माच्या उत्थानाची वेळ आली आहे आणि आपला आश्रम त्यामध्ये अग्रभागी आहे.’
२. श्री. रवि निर्मल ग्यानचंदानी (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), यवतमाळ, महाराष्ट्र.
अ. ‘मला आश्रमातील वातावरणात स्थिरता आणि ऊर्जेचा अनुभव आला.’
३. श्री. आकाश फडे (विभागप्रमुख, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान), जळगाव, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात आल्यावर मनाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते.
आ. साधना आणि धर्मकार्य करायला उत्साह मिळतो.’
४. अधिवक्ता नामदेव गिरड (शहरमंत्री, रा.स्व.संघ), शेवगाव, अहिल्यानगर, महाराष्ट्र.
अ. ‘ज्ञान-विज्ञानासह धर्म आणि अध्यात्म यांची जोड देऊन भविष्यात भारताची विश्वगुरु पदाकडे निश्चित वाटचाल होईल’, या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे.
आ. आश्रमाचे बांधकाम शास्त्रीय दृष्टी ठेवून केले आहे.
इ. आश्रमातील साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याच्या दृष्टीने वाटचाल होत आहे. भविष्यात विश्व या आश्रमाकडे दीपस्तंभ म्हणून पाहील. त्या दृष्टीने नियोजन आहे.’
५. अधिवक्ता गणेश नागरगोजे, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात सूक्ष्म स्तरावर आणि शास्त्रोक्त पद्धतीची व्यवस्था आहे.
आ. सर्व साधक मंडळींचे उत्तम सहकार्य आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.६.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |