सांगली येथे २९ सप्टेंबरला विनामूल्य आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबीर !

या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखरेची पडताळणी, ई.सी.जी., आहार तज्ञांचे मार्गदर्शन, तसेच प्रत्येकाची आधुनिक वैद्यांद्वारे (डॉक्टरांद्वारे) पडताळणी करण्यात येणार आहे.

मिरज येथे टोळी युद्धातून अफगाण दरबार उपाहारगृहाची तोडफोड, ८ जण घायाळ !

टोळी युद्धातून शहरातील बसस्थानक रस्त्यावरील उपाहारगृह अफगाण दरबारची काझी टोळीने तोडफोड केली. गुंड म्हमद्या नदाफ आणि काझी टोळीत व्यावसायिक संघर्षातून ही तोडफोड करण्यात आली आहे.

प्रतिदिन राज्यभरातून येणार्‍या सहस्रो वारकर्‍यांची पंढरपूर येथे लूटमार !

ज्या ठिकाणी मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही, त्या सर्वच ठिकाणी रिक्शाच्या भाड्याच्या ठिकाणानुसार दरपत्रक फलक लावला गेला पाहिजे !

India : जगातील सर्वांत शक्तीशाली देशांच्या सूचीत भारत तिसर्‍या स्थानी; जपानला टाकले मागे !

आशियातील शक्तशाली देशांच्या निर्देशांकात (‘एशिया पॉवर इंडेक्स’मध्ये) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.

उत्तरप्रदेश सरकार शाळांमध्‍ये मुलींना नि:शुल्‍क ‘सॅनिटरी पॅड’ देणार !

योगी सरकारने आता जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील मुलींना त्‍यांची नियमित उपस्‍थिती सुनिश्‍चित करण्‍यासाठी ‘सॅनिटरी पॅड’ देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !

एवढी थकबाकी होईपर्यंत महावितरणचे अधिकारी काय करत होते ?

थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईत लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू…भजनी मंडळाचा टेंपो नाल्यात पडला !…..

मुंबईत लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू…भजनी मंडळाचा टेंपो नाल्यात पडला !….. पुष्पक एक्सप्रेसमधून प्रतिबंधित औषधे नेणारा धर्मांध कह्यात !….गाडीचा हप्ता मागणार्‍या तरुणाचा मारहाणीत मृत्यू !….८ वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणार्‍या डॉक्टरला अटक !

महिष दसरा समितीने मैसुरूचे नाव ‘महिषुरू’ ठेवले !

असुराचे उदात्तीकरण करणारे धर्मद्रोही असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच टाकायला हवे !

पारोळा येथे लाचखोर मुख्याध्यापक अटकेत

मुख्याध्यापकच लाच घेत असतील, तर विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे संस्कार कोण करणार ?

अल्पवयीन मुलांच्या विरोधात बाल न्याय मंडळामध्ये अन्वेषण अहवाल सादर

अपघाताच्या वेळी ‘पोर्शे’ कारमधील अन्य २ मुलांचे रक्ताचे नमुने पालटल्याचे अन्वेषणातून निदर्शनास आले आहे. त्या प्रकरणी आदित्य सूद आणि आशिष मित्तल यांचा सक्रीय सहभाग दिसून आला होता.