पारोळा (जिल्हा जळगाव) – शहरातील एन्.ई.एस्. बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी तेथील कार्यरत असलेल्या शिपायाला ‘तुला नोकरी टिकवायची असेल, तर १० सहस्र रुपये दे’, असे सांगितले. संबंधित शिपायाने या प्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर सापळा रचून गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिका :मुख्याध्यापकच लाच घेत असतील, तर विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे संस्कार कोण करणार ? |