Pannun Announce Reward : कंगना राणौत यांना थोबाडीत मारणार्‍या शीख महिला शिपायाला खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्याकडून ८ लाख रुपयांचे बक्षीस घोषित !

सुरक्षायंत्रणांमध्येच सुरक्षेला धोकादायक असणारे भरती झालेले असणे देशासाठी धोकादायकच ! इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एक अनुभव देशाने घेतलेला आहे, हे पहाता याविषयी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे !

अवजड वाहनांना बंदी असतांनाही सिंहगड रस्त्यावर (पुणे) टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू !

टँकर अवैधरित्या रस्त्यावरून जात असतांना त्यावर कुणीच कारवाई करत नाही का ?

हवामानशास्त्र विभागाकडून चुकीचा अंदाज वर्तवल्याने पुणे येथे आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याचे चित्र !

महापालिकेच्या उदासीनतेमुळे शहराच्या अनेक भागांत ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी !

ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज करण्याचे ‘रूपी बँके’चे ठेवीदारांना आवाहन !

बँकेने आतापर्यंत ७९६ कोटी २० लाख  रुपयांच्या ठेव रकमा परत केल्या आहेत. ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज न केलेल्या ठेवीदारांनी संबंधित शाखेशी त्वरित संपर्क करावा आणि आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे अर्ज बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये द्यावेत, असे आवाहन बँकेने केले आहे.

मंत्रीपदाच्या मुक्ततेच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस देहलीला रवाना !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्यासाठी सरकारमधून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची वाच्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

पुणे येथे किरकोळ कारणावरून पोलीस कर्मचार्‍याकडून मारहाण !

अशा प्रकारे नागरिकांना दरडावणारे आणि मारहाण करणारे कायद्याचे रक्षक असू शकतात का ?

रक्ताचा नमुना हा मुख्य अल्पवयीन आरोपीच्या आईचाच !

‘प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळे’चा अहवाल !

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून या दिवशी चालू करण्यात यावे, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ६ जून या दिवशी मंत्रीमंडळाची बैठक झाली.

हिंदूंच्या दुःस्थितीवरील एकमेव उपाय, म्हणजे त्यांनी साधना करणे !

पूर्वीच्या काळी हिंदू धर्माचरणी आणि धर्माभिमानी होते. त्यामुळे त्यांना ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो’,  हे लागू होत होते.

गुरुपौर्णिमेला ४४ दिवस शिल्लक

परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे गुरु केवळ करस्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देतात.