मुंबई – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून या दिवशी चालू करण्यात यावे, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ६ जून या दिवशी मंत्रीमंडळाची बैठक झाली.
राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काम गतीने करण्याचा, तसेच दिव्यांग मंत्रालयाद्वारे गतीने काम करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.