आनंदवनात विवाहितेचा खून !

चंद्रपूर – अंध वडिलांना घेऊन आई सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याने विवाहित महिला वडिलांच्या घरी एकटी होती. या वेळी अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून तिचा खून केला. मृत महिलेचे नाव आरती चंद्रवंशी (वय २४ वर्षे) असे आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे ही घटना घडली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला बोलावण्यात आले आहे.