रुग्णवाहिकेअभावी ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार !

गडचिरोली – अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आर्यन तलांडी असे त्याचे नाव आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला होता.