हिंदु धर्माचरणामागे आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचार ! – श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी, बालेहोन्नरू, खासा शाखा मठ, श्रीक्षेत्र सिद्धरामबेट्टा, तुमकुरू, कर्नाटक

वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून)

श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी

विद्याधिराज सभागृह – सनातन धर्मानेच शांती मिळते, यावर विदेशातील लोकांचाही विश्वास आहे. या सनातन हिंदु धर्माचा नाश करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. हे थांबवण्यासाठी सर्व संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु धर्मप्रेमी यांना प्रयत्न करावे लागतील. तरच आपला धर्म टिकणार आहे. हिंदु धर्माचरणामागे  आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचारही आहे.

अन्य धर्मीय त्यांच्या धर्माविषयी प्रश्न विचारत नाहीत; पण हिंदु धर्माचरण करण्यापूर्वी प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला हिंदूंना धर्माचरणामागील वैज्ञानिक कारणे सांगणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सर्वांना यश प्राप्त व्हावे, असे आशीर्वचन तुमकुरू (कर्नाटक) येथील वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी महाराज यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त दिले.