हिंदु धर्मविरोधकांकडून केल्या जाणार्‍या खोटा प्रचाराविरूद्ध आक्रमक पवित्रा आवश्यक ! – डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा  ट्रस्ट, तेलंगाणा

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा चौथा दिवस (२७ जून)

डॉ. भास्कर राजू वी.

संपूर्ण विश्वामध्ये सनातन धर्मच सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहे. ख्रिस्ती, इस्लामी आणि नास्तिक म्हणजे साम्यवादी यांच्याकडून खोटा प्रचार केला जात आहे. खोटी कथानके रचली जात आहे. याला सामोरे जातांना सनातनधर्मीय बचावात्मक पवित्रा घेत आहेत; मात्र आता वेळ आली आहे की, या खोट्या प्रचाराला सामोरे जातांना आक्रमक आपण पवित्रा घेणे आवश्यक आहे, असे मत तेलंगाणा येथील धर्ममार्गम् सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. भास्कर राजु वी. यांनी येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात व्यक्त केले.

डॉ. भास्कर राजु वी. पुढे म्हणाले की, ख्रिस्ती आणि इस्लामी हे पाखंडी आहेत, तर साम्यवादी हे देशद्रोही आहेत. या लोकांची विचारसरणी अमान्य केली पाहिजे. त्यांची खोटी कथानके फेटाळणारे ‘नॅरेटिव्ह’ आपण सिद्ध केले पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारचे भेद बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटितपणे आपण हे आक्रमक धोरण राबवले पाहिजे. ते करतांना पाखंडी, जिहादी, धर्मांध, ‘कन्व्हर्जन माफिया’, ‘अर्बन नक्सल’ (शहरी नक्षलवाद) इत्यादी शब्दांचा सर्रास वापर केला पाहिजे.