रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते करण्यात आले ‘षोडश-नित्यदेवी यंत्रा’चे पूजन !

षोडश-नित्यदेवी यंत्र

रामनाथी (गोवा) – सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते १८ जून या दिवशी ‘स्वाती’ नक्षत्र असतांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने ‘षोडश-नित्यदेवी यंत्रा’चे विधीवत् पूजन करण्यास सांगितले होते. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सूक्ष्मातून येणारे अडथळे दूर व्हावेत आणि त्यासंबंधीची सेवा करणारे हिंदुत्वनिष्ठ अन् कार्यकर्ते यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उर्जा प्राप्त व्हावी’, या उद्देशाने हे पूजन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या पूजनाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेचे सर्वश्री अमर जोशी आणि सिद्धेश करंदीकर यांनी केले. १६.२.२०२४ या दिवशी ‘रथसप्तमी’ या तिथीला सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ब्रह्मोत्सवासाठी सिद्ध केलेल्या रथात ‘षोडश-नित्यदेवी यंत्र’ पूजन करून ठेवण्यात सांगितले आहे.

‘षोडश-नित्यदेवी यंत्रा’चे पूजन करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ