धर्मांध आरोपींना नमाजला सोडवण्यासाठी जिन्सी पोलीस ठाण्यात धर्मांधांचा गोंधळ !

छत्रपती संभाजीनगर येथे कत्तलीसाठी आणलेले ९५ गोवंश पोलिसांनी सोडवले !

जिन्सी पोलीस ठाण्यात धर्मांधांचा गोंधळ

छत्रपती संभाजीनगर – बकरी ईदनिमित्ताने अवैध कत्तलीसाठी आणलेले ९५ गोवंशीय पोलिसांनी सोडवले. या प्रकरणातील २ धर्मांध आरोपींना जिन्सी पोलिसांनी कह्यात घेतले होते; मात्र ‘हे आरोपी सराईत नाहीत. त्यांना ईदच्या नमाजासाठी सोडा’, असे म्हणत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी अटकेत असलेल्या २ आरोपींना नोटीस देऊन सोडले; मात्र आवश्यकता पडल्यास त्यांना पुन्हा कह्यात घेण्यात येईल’, अशी माहिती उपायुक्त नवनीत काँवत यांनी दिली. १७ जून या दिवशी जिन्सी ठाण्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. (गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना त्याचे भय नसल्यामुळे ते बिनदिक्कतपणे गोवंश कत्तलीसाठी नेतात. अन्य धर्मांध त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. धर्मांधांच्या जमावाच्या रेट्यापुढे पोलीस कारवाई करण्यास घाबरले, असाच संदेश यातून जातो. पोलीस कठोर भूमिका केव्हा घेणार ? – संपादक)

जिन्सी पोलिसांनी १७ जूनच्या पहाटे टाइम्स कॉलनी भागात कारवाई करत १२ गोवंशीय सोडवले. गोवंशाची तस्करी करणारे आरोपी शफीउद्दीन अल्लाउद्दीन काजी (वय ४६ वर्षे) आणि सय्यद इफ्तेसाम उदीन (वय २८ वर्षे) यांना सकाळी ६ वाजता कह्यात घेतले. त्यांना जमावाच्या ठिय्यानंतर कलम ४१ नुसार नोटीस बजावत सोडून दिले, असे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.

कत्तलीसाठी गोवंश नेणार्‍या दोघांना वाळूज येथे अटक !

कत्तलीसाठी गोवंश जनावरे नेणार्‍या अफरोज शेख (बायजीपुरा) आणि क्लिनर जब्बार कुरेशी (अन्सार कॉलनी) या दोघांना १७ जूनच्या पहाटे वाळूज एम्.आय.डी.सी. पोलिसांनी अटक केली. त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(म्हणे), ‘जनावरे बाजारातच येऊ देऊ नका !’

‘एम्.आय.एम्.’चे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, जनावरांना कत्तलीपासून रोखायचे असेल, तर सरकारने ती बाजारात येऊच देऊ नये. बाजारात येतात म्हणून लोक खरेदी करतात आणि दलालच पोलिसांना ही माहिती देतात. पोलिसांच्या कारवाईत दुजाभाव आहे. या प्रकरणात लोकांना अटक करण्याची कायद्यात तरतूद नाही. याविषयी आर्थिक व्यवहार झाले.

पोलिसांकडून झालेल्या कारवाया पुराव्यांवर आधारितच आहेत. प्रविष्ट झालेल्या प्रत्येक प्रकरणाचे अन्वेषण हे पारदर्शकपणे करू. काही तक्रारी असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा. – नवनीत काँवत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२