BharatRatna To Yashvantrao Chavan : सत्तेत आल्यास यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा प्रयत्न करू ! – राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून २२ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र घोषित करण्यात आले !

काँग्रेस मुसलमान आणि घुसखोर यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल ! – पंतप्रधान मोदी

आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले होते, ‘देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’ याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची अधिक मुले आहेत त्यांना वाटणार आणि घुसखोरांना वाटणार.

माझ्या वक्तव्याने नेहाच्या पालकांना दुःख झाले असेल, तर मी खेद व्यक्त करतो ! – जी. परमेश्‍वर, गृहमंत्री, कर्नाटक

जी. परमेश्‍वर आणि काँग्रेसचे त्यांचे साथीदार यांना हिंदूंच्या दु:खाशी काहीच देणेघेणे नाही, हेच सत्य आहे. आता केवळ निवडणुकांवर या प्रकरणाचा परिणाम होऊ न देण्यासाठीच परमेश्‍वर अशा प्रकारे नक्राश्रू ढाळत आहेत. तथापि हिंदू सूज्ञ आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे !

Boycott Lok Sabha Elections 2024 : कुणकेरी (सिंधुदुर्ग) येथील सरुंदेवाडीत सर्वपक्षियांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बंदी !

हे जनतेच्या विकासाच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद ! सर्वत्रच्या जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्ष आणि प्रशासन काय करतील ?

प्रचारगीतामधून ‘जय भवानी’ उल्लेख हटवणार नाही ! – उद्धव ठाकरे  

‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द काढल्यावर भविष्यात ‘जय शिवाजी’ उल्लेख काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही.

Nigerian Attack Bengaluru Police : बेंगळुरू (कर्नाटक) येथे नायजेरियाच्या नागरिकांकडून पोलिसांवर आक्रमण

नायजेरियाचे नागरिकांनी पोलिसांना दांडक्यांनी मारहाण केली. पोलीस गाडीत बसून पळू लागल्यावर त्यांच्यावर दगडफेक केली.

GOA OCI Card Issue : ‘ओ.सी.आय्.’ कार्डसाठी आता भारतीय पारपत्र समर्पण केल्याचे  प्रमाणपत्र पुरेसे

‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळवण्यासाठी आता पर्यायी कागदपत्र म्हणून पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचा सहस्रो गोमंतकीय आणि त्यांचे कुटुंबीय यांना लाभ मिळणार आहे.

PM MODI : ख्रिस्ती समाजाच्या सहकार्यानेच गोव्यात भाजपचे सरकार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘ख्रिस्ती समाज भाजपला पाठिंबा देत नाही’, असे म्हणता येणार नाही; मात्र भाजपला यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करत आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

१८००२२१९५० या क्रमांकावर मतदानाविषयी २४ घंटे साहाय्य !

१८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात या क्रमांकावर ७ सहस्र ३१२ जणांनी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. यासह शंकानिरसनासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे (०२२) २२०२१९८७ आणि (०२२) २२०२६४४२ हे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात

४७ सहस्र ३९२ कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाचा आदेश !

निवडणूक आयोगाच्या विविध २० निकषांन्वये कर्मचार्‍यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांच्या अर्जाची शहानिशा केल्यावरच त्यांचे अर्ज संमत केले आहेत.