बेंगळुरू (कर्नाटक) – शहरात नायजेरियाच्या नागरिकांकडून माहिती गोळा करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्या नागरिकांनी आक्रमण केल्याची घटना मावळ्ळीपूर येथे १९ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. यात ४ पोलीस घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.
Police were attacked In Bengaluru, Karnataka by some #Nigerian citizens.
If the Police themselves are beaten up by foreign nationals in a Congress-ruled state, then how will such Police protect themselves and the public from terrorists?#Bengaluru #drug pic.twitter.com/YA7Ja8qoOj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2024
पोलीस आणि नायजेरियाचे नागरिक यांच्यामध्ये प्रथम वाद झाला. त्यानंतर या नागरिकांनी त्यांच्या अन्य लोकांना दूरभाष करून घटनास्थळी बोलावले. ते दुचाकीवरून तेथे पोचल्यावर त्यांनी पोलिसांना दांडक्यांनी मारहाण केली. पोलीस गाडीत बसून पळू लागल्यावर त्यांच्यावर दगडफेक केली. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात विदेशी नागरिकांकडून मार खाणारे पोलीस ! असे पोलीस आतंकवाद्यांकडून स्वतःचे आणि जनतेचे रक्षण कसे करणार ? |