१८००२२१९५० या क्रमांकावर मतदानाविषयी २४ घंटे साहाय्य !

मुंबई – मतदार ओळखपत्र प्राप्त न होणे, नवीन मतदार नोंदणी, मतदारसूचीतील नावाची पडताळणी, पत्त्यामधील पालट, नावातील दुरुस्ती, नाव वगळणे, मतदार ओळखपत्र आधारकार्ड आणि भ्रमणभाष क्रमांक यांच्याशी जोडणे आदी मतदानाविषयी कोणतीही शंका असल्यास १८००२२१९५० या निवडणूक आयोगाच्या क्रमांकावरून २४ घंटे मार्गदर्शन देण्यात येत आहे.

१८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात या क्रमांकावर ७ सहस्र ३१२ जणांनी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. यासह शंकानिरसनासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे (०२२) २२०२१९८७ आणि (०२२) २२०२६४४२ हे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.