BharatRatna To Yashvantrao Chavan : सत्तेत आल्यास यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा प्रयत्न करू ! – राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे आमचे प्रेरणास्थान आहे. सत्तेत आल्यास त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक घोषणापत्रात दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून २२ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र घोषित करण्यात आले आहे.

या घोषणापत्रामध्ये शेतीसाठी पारंपरिक वीजनिर्मिती करणे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणे, उर्दू शाळांमध्ये सेमी इंग्रजीला प्रारंभ करणे, नद्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पांना चालना देणे आदी आश्‍वासने देण्यात आली आहेत.