|
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – फैयाज खोंडुनाईक या मुसलमान युवकाने नेहा हिरेमठ हिच्या केलेल्या हत्येवरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतांना काँग्रेस हिंदुद्वेष्टे राजकारण करण्यात गुंतली आहे. नेहा ही काँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी होती. तिच्या वडिलांनी ही घटना ‘लव्ह जिहाद’ असल्याचे म्हटले; मात्र राज्याचे गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते जी. परमेश्वर यांनी हा प्रकार लव्ह जिहाद नसल्याचे सांगत ही हत्या वैयक्तिक कारणामुळे झाली, असे सांगितले. यावरून नेहाचे आई-वडील आणि हुब्बळ्ळीच्या महिला यांचा संताप अनावर झाला. त्यामुळे परमेश्वर यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, माझ्या बोलण्यामुळे नेहाच्या आई-वडिलांचे मन दुखावले गेले असल्यास मी खेद व्यक्त करतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी माझ्या घराला घेराव घातल्याने हे प्रकरण राजकीय बनत आहे. मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदारीच्या स्थानावर आहोत. आम्ही उगाचच वक्तव्य करत नाही. मला मिळालेल्या माहितीच्या आधारावर मी निवेदन दिले. चौकशी चालू असून ती संपल्यावर सत्य-असत्य समजेल.
संपादकीय भूमिकाजी. परमेश्वर आणि काँग्रेसचे त्यांचे साथीदार यांना हिंदूंच्या दु:खाशी काहीच देणेघेणे नाही, हेच सत्य आहे. आता केवळ निवडणुकांवर या प्रकरणाचा परिणाम होऊ न देण्यासाठीच परमेश्वर अशा प्रकारे नक्राश्रू ढाळत आहेत. तथापि हिंदू सूज्ञ आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे ! |