Boycott Lok Sabha Elections 2024 : कुणकेरी (सिंधुदुर्ग) येथील सरुंदेवाडीत सर्वपक्षियांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बंदी !

गावातील ओहोळावर पूल बांधण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

सर्वपक्षियांना निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवेश-बंदीचा लावलेला फलक !

सावंतवाडी : तालुक्यातील कुणकेरी गावातील सरुंदेवाडी येथे जाण्याच्या मार्गावर मोठा ओहोळ आहे. पावसाळ्यात या ओहोळात पाणी आल्यानंतर वाडीचा इतर भागांशी संपर्क तुटतो. त्यामुळे ‘या ओहोळावर पूल बांधावा’, अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली कित्येक वर्षे करत आहेत. यासाठी त्यांनी सर्वपक्षीय मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली; मात्र निवडणुकीच्या वेळी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर येणार्‍या सर्वच निवडणुकांच्या वेळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते अन् कार्यकर्ते यांना वाडीमध्ये प्रचारासाठी येण्यास बंदी असल्याचा फलक वाडीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणार्‍या राजकीय पक्षांना ही एक चपराकच आहे.

संपादकीय भूमिका

  • हे जनतेच्या विकासाच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद !
  • सर्वत्रच्या जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्ष आणि प्रशासन काय करतील ?