मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी ६० किमी वेगमर्यादा लागू !

गेल्या २ दिवसांपासून नवीन वेगमर्यादेची कार्यवाही चालू झाली आहे.

४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, उलट्या यांचा त्रास !

मुंबई विद्यापिठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असे त्रास होत आहेत.

मारहाण करणार्‍या धर्मांध समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी !

जिल्ह्यातील देवपूर येथे १८ एप्रिल या दिवशी श्रीरामाची गाणी वाजवली; म्हणून मुसलमानांनी भाविकांवर दगडफेक केली. ५-६ भाविकांना मारहाणही केली. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला.

कडूस (पुणे) येथील ‘दक्षणा फाऊंडेशन’च्या ५५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

जेईई आणि आयआयटी परीक्षेची पूर्वसिद्धता करणार्‍या कडूस (तालुका खेड) येथील ‘दक्षणा फाऊंडेशन’मधील ५५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली.

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांतील नागरिकांना मतदार नावनोंदणीची संधी !

यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी मशिदींमधून फतवे निघत आहेत ! – राम सातपुते, उमेदवार, महायुती

राम सातपुते पुढे म्हणाले की, राज्यघटना वाचवण्यासाठी मोदी यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. मशिदीतून फतवे काढून राज्यघटनेला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. वेगवेगळी पत्रके काढली जात आहेत.

पीएच्.डी. करणार्‍या पुरोगामी विद्यार्थ्याचे २ वर्षांसाठी निलंबन !

‘टीस’ने ही कारवाई केली, ते योग्यच झाले; परंतु सध्या देशातील वातावरण पाहून संस्थेने स्वतःचा बचाव करण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना ? असे कुणालाही वाटू शकते. संस्थेतील एकूणच पुरोगामी वातावरण पालटण्यासाठी प्रयत्न झाले, तरच या कारवाईला अर्थ राहील !

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई ‘वॉन्टेड (हवा असलेला) आरोपी’ घोषित !

अभिनेते सलमान खान यांच्या घरावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना कह्यात घेतले आहे.

संभाजीनगरसह मराठवाड्याला वादळी पावसाने झोडपले !

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी वादळी पाऊस झाला. लातूर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत २ घंटे गारपीट झाली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राज्यात ३१७ अर्ज वैध ; मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग !…

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी लोकसभेच्या ११ मतदारसंघांत एकूण ३१७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.