आनंदी जीवन जगण्यासाठी नामजपासह स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

नामसाधनेसह आपल्यातील दोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आनंदमय जीवन कसे जगायचे, यासाठी सनातन संस्था मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी येथील ‘गगन भारती पब्लिक सिनियर सेकेंडरी स्कूल’मध्ये आयोजित ‘तणावमुक्ती कार्यशाळे’त केले.