भारत आत्मविश्वासाने आणि वेगाने पुढे जात आहे ! – चीन
चीनने भारताचे कौतुक केल्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. चीनने भारताचा नेहमीच विश्वासघात केल्याने त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही !
चीनने भारताचे कौतुक केल्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. चीनने भारताचा नेहमीच विश्वासघात केल्याने त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही !
सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !
खंडपिठाने सांगितले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दिलेला जामीन तर्कसंगत आहे. त्यामुळे अर्जाकडे लक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही.’’
न्यायालयाच्या आदेशावरून खाण व्यावसायिकांच्या एकूण २० ठिकाणी या धाडी घातलण्यात आल्या. खाण व्यवसायातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी या धाडी घालण्यात आल्या.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली.
उद्योगपती गौतम अदानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या सूचीमध्ये ते १२ व्या स्थानावर पोचले आहेत. श्रीमंतांच्या सूचीत त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.
सोमालियातील समुद्रीचाच्यांनी (लुटेर्यांनी) अरबी समुद्रातील एका खासगी व्यापारी नौकेचे अपहरण केले आहे. यात १५ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने युद्धनौका पाठवली आहे.
खलिस्तानी आंतकवादी आणि भारतविरोधी गुरपतवंत सिंह पन्नु याच्यावर कारवाई न करणार्या अमेरिकेत याहून वेगळे काय घडणार ? अशा घटनांविषयी भारताने अमेरिकेला सज्जड भाषेत जाणीव करून देणे आवश्यक आहे !
केंद्रीय औषध नियामक मंडळाने रक्ताच्या पिशव्या पैसे घेऊन विकण्यावर बंदी घातली आहे. यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालये यांना रक्ताची विक्री करता येणार नाही.
गेल्या ५ वर्षांत हिट अँड रनच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. वर्ष २०१८ मध्ये प्रलंबितचे प्रमाण ९०.४ टक्के होते, तर वर्ष २०२२ मध्ये वाढून ९३ टक्के झाले.