Somalia Merchant Ship Hijacked : सोमालियातील समुद्री लुटेर्‍यांनी व्यापारी नौकेचे केले अपहरण !

  • नौकेवर १५ भारतीय कर्मचारी

  • नौकेच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने पाठवली युद्धनौका !

मुंबई – सोमालियातील समुद्रीचाच्यांनी (लुटेर्‍यांनी) अरबी समुद्रातील एका खासगी व्यापारी नौकेचे अपहरण केले आहे. यात १५ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने युद्धनौका पाठवली आहे. ‘लीला नॉरफोक’ असे या नौकेचे नाव आहे. ही नौका ब्राझिलमधील पोर्टो डो अकू येथून बहरीनमधील खलिफा बिन सलमान बंदराकडे जात होती.

भारतीय नौदलाने सांगितले की, या नौकेवरील कर्मचार्‍यांनी ५-६ सशस्त्र लुटेर्‍यांनी नौकेमध्ये घुसखोरी केल्याचा संदेश भारतीय नौदलाला पाठवला होता. संदेश प्राप्त झाल्यानंतर ‘आय.एन्.एस्. चेन्नई’ ही युद्धनौका मार्गस्थ झाली होती. अपहरणाची माहिती मिळताच सागरी गस्त घालणारे विमान नौकेच्या दिशेने पाठवण्यात आले. विमान नौकेच्या ठिकाणी पोचले आणि कर्मचार्‍यांशी संपर्क साधल्यावर सर्व जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली.