National Crime Records Bureau : ‘हिट अँड रन’च्या प्रकरणात बहुतांश आरोपी निर्दोष सुटतात ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

(‘हिट अँड रन’ प्रकरणांत रस्त्यावरील अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून जातात आणि पोलिसांना माहिती देत नाहीत.)

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या वर्ष २०२२ च्या आकडेवारीनुसार ‘हिट अँड रन’ प्रकरणातातील बहुतांश आरोपी आरोप सिद्ध न झाल्याने निर्दोष सुटले आहेत.

१. गेल्या ५ वर्षांपैकी २ वर्षांत शिक्षेचे प्रमाण ५० टक्क्यांच्याही खाली राहिला. केवळ अपवाद म्हणून वर्ष २०२० मध्ये ५८.१ टक्के आणि २०२१ मध्ये ५१.९ टक्के इतके प्रमाण राहिले आहे. इतर गंभीर गुन्ह्यांत शिक्षेचे प्रमाण आणखी अल्प आहे. वर्ष २०२२ मध्ये हत्येच्या खटल्यांत शिक्षेचे प्रमाण ४३.८ टक्के, तर अपहरण आणि अपहरणाचा प्रयत्न यांत हे प्रमाण ३३.९ टक्के इतके होते.

२. गेल्या ५ वर्षांत हिट अँड रनच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. वर्ष २०१८ मध्ये प्रलंबितचे प्रमाण ९०.४ टक्के होते, तर वर्ष २०२२ मध्ये वाढून ९३ टक्के झाले.

संपादकीय भूमिका 

आरोपी निर्दोष सुटतात, याचा अर्थ त्यांनी खरेच गुन्हा केला नाही किंवा त्यांनी गुन्हा केला, हे पोलीस सिद्ध करू शकले नाहीत ! याखेरीज ‘जर आरोपी निर्दोष सुटतात, तर मग गुन्हा कुणी केला ?’, हा प्रश्‍न अनुत्तरितच रहातो ! अशा वेळी या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक ठरते !