Nepal Earthquake : भारत नेपाळच्या भूकंपग्रस्तांसाठी आणखी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देणार ! – डॉ. एस्. जयशंकर

डावीकडून डॉ. एस्. जयशंकर आणि नारायण प्रकाश सौद

काठमांडू (नेपाळ) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली. या बैठकीत व्यापार, आर्थिक संबंध, भूमी, रेल्वे, संरक्षण, संरक्षण, कृषी, ऊर्जा, जलसंपदा, हवाई संपर्क, पर्यटन, नागरी विमान वाहतूक इत्यादी क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. भारत सरकार नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी आणखी १ सहस्र कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देईल, अशी घोषणा जयशंकर यांनी या वेळी केली.

या वेळी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांनी सांगितले की, भारताशी केलेले करार हे दोन्ही देशांमधील सशक्त संबंधांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.  गेल्या नोव्हेंबरमध्ये ६.४ तीव्रतेच्या भूकंपात १२८ लोक ठार झाले होते, तर १४१ लोकांनी घायाळ झाले होते.

१. तत्पूर्वी डॉ. जयशंकर यांनी काठमांडूमध्ये नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांवर विचार मांडले.

२. जयशंकर यांनी नेपाळी क्रिकेट मंडळाच्या सदस्यांशीही संवाद साधला.