पुणे येथील ससून रुग्णालयातील बंद असलेली ‘एच्.एम्.आय.एस्.’ प्रणाली पुन्हा चालू !

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधील कामकाज पूर्वी ‘हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ (‘एच्.एम्.आय.एस्.’) प्रणालीद्वारे चालत होते…

Sindhudurg Naval Day : नौदलदिनाच्या औचित्यावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसराचा असा झाला कायापालट !

नौदलदिनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून मालवण आणि परिसराचे रूप पालटून गेले आहे.

हा तर अमृतकाळातील पूर्वरंगाचा प्रसाद ! – विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप

भारताच्या जनतेस गेल्या पंचाहत्तर वर्षांत प्रथमच भाजपच्या सत्ताकाळातील अमृतकाळाची अनुभूती येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयाच्या पार्श्वभूमीवर केले.

पुणे येथे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी जुने हँडग्रेनेड आढळले !

बाणेर येथील ‘आयसरल इन्स्टिट्यूट’ येथे मेट्रोचे काम चालू आहे. इन्स्टिट्यूटच्या मोकळ्या जागेत पाइप टाकण्याच्या कामासाठी खड्डे खणले आहेत, त्यामध्ये एक जुने गंजलेले हँडग्रेनेड आढळले.

भाजपच्या के.व्ही.आर्. रेड्डी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना केले पराभूत

भाजपचे के.व्ही.आर्. रेड्डी हे कामारेड्डी मतदारसंघातून ६६ सहस्र ६५२ मते मिळवून विजयी झाले.

येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी संजय मरसाळे यांना अटक !

आधुनिक वैद्य संजय मरसाळे यांनी आजपर्यंत कुणाकुणाला ‘ससून रुग्णालया’मध्ये भरती करण्याची शिफारस पत्रे दिली आहेत ? त्या मोबदल्यात त्यांनी किती पैसे घेतले ? कसे आणि कोणत्या मार्गाने घेतले ? याचे अन्वेषण गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

बाजारात तुरीला सरासरी १० सहस्र प्रतिक्विंटलचा भाव !

या वर्षी तूरडाळीचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत अल्प येण्याची शक्यता आहे. सध्या आफ्रिका आणि इतर देशांमधून तूरडाळ आयात केली जात आहे.

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी (पुणे) येथे ८० किलो संशयित गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता !

गोंदवले बुद्रुक (जिल्हा सातारा) गावात मद्यबंदीचा ठराव संमत !

गोंदवले बुद्रुक हे गाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. अशा ठिकाणी गावात भटकणारे मद्यपी आढळून येतात. ही गोष्ट अशोभनीय असून याचा त्रास महिला आणि भाविक यांना होत असतो.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार ? – गिरीश महाजन, भाजप

मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी ४ दिवसांचा काळ पुरेसा नसून १ मासाची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो, असे महाजन यांनी सांगितले होते.