ललित पाटील पलायन प्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई !
पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील याच्या पलायन प्रकरणी येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी आधुनिक वैद्य संजय मरसाळे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक केली होती. ललित पाटील हा येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. त्या वेळी त्याने आजारी असल्याचे कारण देत ‘ससून रुग्णालया’मध्ये उपचारासाठी भरती करवून घेतले होते. त्यास वैद्य मरसाळे यांनी शिफारस पत्र दिले होते.
Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई@PuneCityPolice @CPPuneCity @DGPMaharashtra @Policenama1
https://t.co/qFwO6kI7YQ— Policenama (@Policenama1) December 4, 2023
आधुनिक वैद्य संजय मरसाळे यांनी आजपर्यंत कुणाकुणाला ‘ससून रुग्णालया’मध्ये भरती करण्याची शिफारस पत्रे दिली आहेत ? त्या मोबदल्यात त्यांनी किती पैसे घेतले ? कसे आणि कोणत्या मार्गाने घेतले ? याचे अन्वेषण गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.