पुणे येथे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी जुने हँडग्रेनेड आढळले !

आढळलेले जुने गंजलेले हँडग्रेनेड

पुणे – बाणेर येथील ‘आयसरल इन्स्टिट्यूट’ येथे मेट्रोचे काम चालू आहे. इन्स्टिट्यूटच्या मोकळ्या जागेत पाइप टाकण्याच्या कामासाठी खड्डे खणले आहेत, त्यामध्ये एक जुने गंजलेले हँडग्रेनेड आढळले. बाँब दिसल्यानंतर मेट्रोच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये कळवले. त्यानंतर बाँब शोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी आले. बाँब जुना असल्याने त्याच ठिकाणी मोठा खड्डा करून बाँबला नष्ट करण्यात आले आहे; मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तूर्तास मेट्रोचे काम थांबण्यात आले आहे.