तेलंगाणा विधानसभा निवडणूक निकालातील क्षणचित्रे !
कामारेड्डी (तेलंगाणा) – भाजपचे के.व्ही.आर्. रेड्डी हे कामारेड्डी मतदारसंघातून ६६ सहस्र ६५२ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पराभव केला. तसेच या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे तेलंगाणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांचाही त्यांनी पराभव केला. कामारेड्डी विधानसभा मतदारसंघ पुष्कळ चर्चेत होता. या मतदारसंघातून तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पक्षाचे (बी.आर्.एस्.चे) सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव, तेलंगाणा प्रदेश काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी आणि भाजपचे क.व्ही.आर्. रेड्डी यांच्यात त्रिकोणी लढत पहायला मिळाली.