गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता !
पुणे – सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळील जयप्रकाश नारायण नगरमधील ‘आलिया मटन शॉप’ या दुकानातून ८० किलो संशयित गोमांस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मांस विक्रेता शफीक कुरेशी याच्या विरोधात हवेली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या दुकानामध्ये गोमांस विक्री होत असल्याची माहिती ‘पतित पावन संघटने’चे खडकवासला विभागाचे उपाध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. संबंधित मटन विक्रेत्याकडे मटन विक्रीचा परवाना होता; परंतु विक्रीसाठी ठेवलेले गोमांस सदृश मांस असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सर्व मांस कह्यात घेतले.