केरळ येथील आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तकोत्‍सवात सनातन संस्‍थेचा सहभाग

कोचीमधील कुरुक्षेत्र पब्‍लिकेशन यांनी आयोजित केलेला आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तकोत्‍सव पार पडला. या पुस्‍तकोत्‍सवामध्‍ये सनातन संस्‍थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचा प्रदर्शन कक्ष लावण्‍यात आला होता. या प्रदर्शन कक्षाला अनेक ठिकाणच्‍या जिज्ञासूंनी भेट देत चांगला प्रतिसाद दिला.

पाकिस्तानमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या

काश्मीरमधील पुलवामा अन् उरी येथील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी हबीबुल्ला उपाख्य भोला खान याची अज्ञातांनी पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या केली.

‘ड्रग्‍ज’च्‍या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाविकास आघाडीच्‍या आमदारांनी विधानभवनाच्‍या पायर्‍यांवर विरोधकांनी घोषणा दिल्‍या.

बांगलादेशींना शासकीय कागदपत्रे मिळवून देणार्‍यांवर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

ऊसतोडणी यंत्राच्‍या अनुदानासाठी संगणकीय सोडत ! – सहकारमंत्री

राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेच्‍या अंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान निधीची राज्‍यस्‍तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्‍यात  येणार असल्‍याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

पुणे येथून आणखी एक आतंकवादी कह्यात !

पुण्‍यातील गुलटेकडी परिसरात रहाणार्‍या तरुणाकडेही ‘एन्.आय.ए.’ने चौकशी केली आहे. एन्.आय.ए.कडून आज दक्षिण भारतातील १९ ठिकाणी शोध चालू आहे.  महाराष्‍ट्रातील अमरावती येथेही धाड टाकण्‍यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यामुळे कोट्यवधी श्रीरामभक्‍तांचे स्‍वप्‍न पूर्ण होत आहे ! – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीराम मंदिर हा विषय अस्‍मिता आणि श्रद्धा यांचा आहेच; पण हा देशाचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यामुळे कोट्यवधी राम भक्‍तांचे स्‍वप्‍न पूर्ण होत आहे. भव्‍य श्रीराम मंदिर सिद्ध झाले आहे.

आमदारांच्‍या वेतनासाठी राज्‍याच्‍या तिजोरीतून प्रतीमास १६ कोटी ७५ लाख रुपयांचा व्‍यय !

विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ७८ अशा एकूण ३६६ आमदारांना प्रत्‍येकी प्रतिमास २ लाख ६१ सहस्र २१६ इतके वेतन मिळते. यामध्‍ये महागाई भत्ता, स्‍टेशनरी, दूरभाष आणि चालकांचे वेतन यांसाठीच्‍या भत्त्याचाही समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ७ गावांत कृषी योजनांचा जागर !

मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायत माहू येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.येथे उपस्थित शेतकर्‍यांना विविध योजनेंविषयी मार्गदर्शन केले.

राजकीय इच्छाशक्ती असल्यास ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाचा प्रश्न सुटेल ! – बाळ माने, माजी आमदार, भाजप

आमच्या भूमी सरकारने परत कराव्यात किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे भूमीचा मोबदला आम्हाला द्यावा, या मागणीसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघाने आंदोलन चालू केले आहे.