केरळ येथील आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तकोत्‍सवात सनातन संस्‍थेचा सहभाग

कोची (केरळ) : कोचीमधील कुरुक्षेत्र पब्‍लिकेशन यांनी आयोजित केलेला आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तकोत्‍सव पार पडला. तसेच १० दिवसांसाठी आयोजित केलेल्‍या या पुस्‍तकोत्‍सवामध्‍ये सनातन संस्‍थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचा प्रदर्शन कक्ष लावण्‍यात आला होता. या प्रदर्शन कक्षाला अनेक ठिकाणच्‍या जिज्ञासूंनी भेट देत चांगला प्रतिसाद दिला.

पुस्‍तकोत्‍सवात लावलेल्‍या प्रदर्शन कक्षात कु. अदिती सुखटणकर आणि श्री. नंदकुमार कैमल

वैशिष्‍ट्यपूर्ण

१. प्रदर्शन कक्षाच्‍या ठिकाणी आलेल्‍या एका जिज्ञासूने सांगितले, ‘‘या कक्षावर पुष्‍कळ चांगले वाटत आहे.’’

२. एक अन्‍य पंथीय व्‍यक्‍ती प्रदर्शन कक्षाच्‍या ठिकाणी येऊन म्‍हणाले, ‘‘तुमच्‍या कक्षामध्‍ये पुष्‍कळ सुगंध येत आहे.’’ या वेळी त्‍यांनी सनातन-निर्मित उदबत्ती आणि अत्तर विकत घेतले.