पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ जणांना चावा !

संतप्त ग्रामस्थांनी कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावर उपचारासाठी ‘अँटिरेबिज लस’ उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून धर्माचरणाला आजपासूनच आरंभ करा ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

भारत देशाची संस्कृती महान असून ही संस्कृती प्रत्येक देशाने अंगीकारल्यास जगात शांतता टिकून राहील. आरोग्य क्षेत्रात भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे.

रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचार्‍यांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

सुरक्षादलातील कर्मचारीच असे कृत्य करत असतील, तर सुरक्षादलावर कुणाचा तरी विश्वास बसेल का ?

मुंबई पोलिसांची अपर्कीती केल्याप्रकरणी उर्फी जावेद हिच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

उर्फी हिने प्रसिद्धीसाठी अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक व्हिडिओ बनवला. ‘छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फी हिला अटक केली’, असा तो व्हिडिओ होता.

कुणबी नोंदी पडताळण्यासाठी शिंदे समिती आता राज्यभर काम करणार !

या संदर्भात शासनाने तातडीने अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश लागू होताच सरकारच्या शिष्टमंडळाने ३ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात जाऊन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, तसेच त्यांना अध्यादेश दाखवला.

३३ सहस्र ७४२ राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर्स, फलक अन् भित्तीपत्रके हटवली !

इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचे विद्रूपीकरण होईपर्यंत महापालिका का थांबली होती ? ही कारवाई त्या त्या वेळीच का केली नाही ?

Durgadi Fort Fraud Case :बनावट कागदपत्रांद्वारे ऐतिहासिक दुर्गाडी गड नावावर करणार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद !

ही जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने ‘त्यांच्याकडून दुरुस्तीची अनुमती द्यावी’, असे पोलिसांना सांगण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील रस्ते धुण्यास प्रारंभ !

मुंबई उच्च न्यायालयाने हवेच्या प्रदूषणावरून फटकारले या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला.

काशी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित २ दिवसांच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

आंध्रप्रदेशमध्ये मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी ‘आझाद हिंद बोर्डा’ची स्थापना !

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.