आंध्रप्रदेशमध्ये मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी ‘आझाद हिंद बोर्डा’ची स्थापना !

बोर्डामध्ये हिंदु जनजागृती समितीचाही समावेश

‘आझाद हिंद बोर्डा’च्या स्थापनेच्या वेळी जमलेले हिंदुत्वनिष्ठ

विजयवाडा (आंध्रप्रदेश) – येथील श्री शैव क्षेत्राचे पीठाधिपति श्री श्री शिव स्वामीजी यांच्या नेतृत्वखाली ‘आझाद हिंद बोर्डा’ची स्थापना करण्यात आली. मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

१. सरकारीकरण झालेल्या मंदिरांना मुक्त करून ती भक्तांच्या हातात देणे, सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या संपत्तीचे रक्षण करणे आणि मंदिरांना पुन्हा धर्मशिक्षणाचे केंद्र बनवणे, या उद्देशांनी आझाद हिंद बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे.

‘आझाद हिंद बोर्डा’च्या स्थापनेच्या वेळी उपस्थित धर्मप्रेमी

२. या बोर्डामध्ये हिंदु संघटना, मंदिरांचे पुजारी, विश्‍वस्त, मठाधिपती, धर्मादाय विभागाचे निवृत्त अधिकारी, मंदिरांसाठी कार्य करणारे अधिवक्ता, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भारतीय प्रशासकीय अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश असणार आहे. यात हिंदु संघटना म्हणून हिंदु जनजागृती समितीचाही समावेश करण्यात आला आहे. हे बोर्ड धर्मादाय विभागाप्रमाणे समांतर कार्य करणार आहे.