तोतया पोलीस आणि चारचाकी यांचा वापर !
मुंबई – व्हिडिओद्वारे मुंबई पोलिसांविषयी खोटी माहिती प्रसारित करून मुंबई पोलिसांची अपर्कीती केल्याप्रकरणी पोलिसांनी उर्फी जावेदसह ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या सर्वांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. व्हिडिओमधील तोतया पोलीस निरीक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केलेली आहे.
एक्ट्रेस उर्फी जावेद आए दिन किसी न किसी वजह से सुर्खियों में आती हैं.
इस बार जब उर्फी ने खुद के अरेस्ट को लेकर एक फेक वीडियो बनाया तो उनकी सच में मुश्किलें बढ़ गईं.
मुंबई पुलिस ने उर्फी के खिलाफ एफआईआर (FIR) रजिस्टर की है, जिसमें उनपर 4 IPC की धाराएं लगाई हैं.
पुलिस का कहना… pic.twitter.com/pOj3MKUP58
— AajTak (@aajtak) November 3, 2023
उर्फी हिने प्रसिद्धीसाठी अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक व्हिडिओ बनवला. ‘छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फी हिला अटक केली’, असा तो व्हिडिओ होता. उर्फी हिचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. तिला पोलिसांनी खरोखरच अटक केल्याचे सर्वांना वाटले; मात्र पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर नोंद घेतली. ‘तोकडे कपडे घातल्याने मुंबई पोलिसांनी अटक केली’, असा चुकीचा संदेश या व्हिडिओतून प्रसारित झाला. त्यामुळे ‘मुंबई पोलिसांची अपर्कीती झाली’, असा आरोप तिच्यावर आहे.